Share

आता सोप्या पद्धतीने आपला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करा, जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

आधार कार्ड आता जवळपास सर्वच ठिकाणी आवश्यक आहे. सरकारी कामांसाठी, सरकारी योजनांसाठी, बँक, घर-वाहन खरेदी यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. आधारसंबंधी कोणतीही माहिती व्यक्तीच्या फोन नंबरवर, ओटीपीद्वारे पाठवली जात असते. परंतु मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर असेल तरच ओटीपी फोनवर येतो असतो. अशात फोन नंबर बदलल्यास किंवा फोन हरवल्यास पुन्हा सोप्या पद्धतीने मोबाईल नंबर आधारशी लिंक करता येणार आहे ते कस करता येईल जाणून घ्या.

मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, आधार केंद्रावर जावे लागेल त्या नंतर तिथे फोन नंबर लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मला करेक्शन फॉर्म म्हटलं जाते. हा फॉर्म भरण्यासाठी 25 रुपये खर्च येतो. योग्य ती माहिती भरल्यानंतर आधार केंद्राकडून एक पावती आपल्याला दिली जाते. यात तुमचा रिक्वेस्ट नंबर असतो. या रिक्वेस्ट नंबरनुसार, मोबाईल क्रमांक आधारशी लिंक झाला की नाही ते आपल्याला पाहता येऊ शकते.

आधारशी नंबर लिंक होण्याची प्रक्रिया जवळपास तीन महिन्यांची असते. फोन नंबर आधारशी लिंक झाल्यानंतर एक ओटीपी आपल्याला मोबाइलला वर येईल. या ओटीपीद्वारे आधार कार्ड डाऊनलोड करता येऊ शकेल. त्याशिवाय UIDAIच्या टोल फ्री 1947 नंबरवर फोन करुन तुमच्या रिक्वेस्ट, स्टेटसची माहिती घेता येऊ तुम्हाला घेता येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या