हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव

बदलत्या हवामानाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत आहे. यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवलामधील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात असल्याची भीती निर्माण झाली आहे. केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

नागपूरच्या विशाल मेगा मार्टमधून बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त

मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने ऐन काढणीस आलेल्या खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असे असतांनाही शेतकरी वर्गाने नाउमेद न होता रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करीत , गहू, हरभरा,ज्वारी आदि पिकांची शेतात मोठया प्रमाणात पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली व पिकेही चांगली आली.

नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

मात्र वातावरणात सतत बदल होत असल्याने तसेच दव ,थंडी व उष्ण वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्व पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गाने विविध प्रकारची बुरशीनाशके,किटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्यासाठी प्रयत्न केले.आता हरभरा पिकाला फुलोरा लागला असून काही ठिकाणी घाटे लागले आहेत. मात्र हरभरा पिकावर अळीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळी ही घाट्याच्या आतमध्ये जात असल्याने औषध फवारणीचा अळीवर परिणाम होत नाही. या अळीमुळे हरभरा उत्पादनात निम्याने घट येणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.