खानदेशात कांदा लागवड सुरूच सुमारे चार हजार हेक्‍टरवर झाली लागवड

खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. कांदा लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, पाचोरा, जळगाव, धरणगाव या भागात अधिकची झाली आहे. मागील हंगामात खानदेशात मिळून सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. लागवड आणखी आठवडाभर किंवा १० दिवस सुरू राहू शकते.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

यंदा ही लागवड सुमारे साडेसहा हजार हेक्‍टरपर्यंत होवू शकते. पडा, यावल व रावेरात मिळून सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होऊ शकते. तर धुळे तालुक्‍यात सुमारे एक हजार ते ११०० हेक्‍टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. तर चोकांद्याचे दर बाजारात सध्या कमी अधिक होत आहेत. परंतु बाजारात उठाव कायम आहे. दर किमान १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.