Share

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा १००० ते ४४०० रुपये प्रतिक्‍विंटल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. तिला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९८ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्यास कमाल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर

३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २००० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वालशेंगांची आवक १२ क्‍विंटल, तर दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १९ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला १३०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ६४ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबांची ९ क्‍विंटल आवक झाली.

कापसाचे दर ५१०० वर

दर १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.कारल्याची आवक ८ क्‍विंटल, तर दर १४०० ते २००० रुपये राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ४०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक १८४ क्‍विंटल, तर दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४८ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १६०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

बातम्या (Main News) बाजारभाव (Market Prices) भाजीपाला (Vegetables)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या