कापसाचे दर ५१०० वर

कापसाची खेडा खरेदी सध्या जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव आदी भागांत बऱ्यापैकी सुरू आहे. तर धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागातही ही खरेदी सुरू आहे. मकर संक्रांतीच्या सणानंतर अनेक मजूर आपापल्या गावाकडे जातात. ते आठ ते १० दिवस येत नाहीत.त्यापूर्वी कापसावर अधिकाधिक प्रक्रिया करून घेण्याचा प्रयत्न कारखानदार करतात. यामुळे मागील आठवड्यात बऱ्यापैकी कापसाची खेडा खरेदी खानदेशात झाली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट

जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ३० ट्रक कापसाची आवक झाली. तर धुळे व नंदुरबारातही प्रतिदिन मिळून १८ ट्रक कापसाची आवक झाली. कापसाखालील कमाल क्षेत्र रिकामे होत असल्याची स्थिती खानदेशात आहे. त्यात मका, बाजरी व गव्हाची पेरणी शेतकरी करीत आहेत. गव्हाची पेरणी आटोपली आहे. परंतु, बाजरीची पेरणी आणखी आठवडाभर सुरू राहील.

इंटरनेट जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त

पणन महासंघाच्या पारोळा, धरणगाव व धुळे येथील केंद्रांत वाहनांच्या रांगा लागत असून, तेथे किमान ५३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर कापसाला मिळत आहे. यामुळे खेडा खरेदीला वेग आला असून, खरेदीदार शेतकऱ्यांना ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सरसकट देत आहेत. कापसाची खरेदी या आठवड्यात आणखी वाढू शकते.