Share

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट

Published On: 

🕒 1 min read

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली. मात्र, बटाटा, भेंडी आणि पावट्याच्या आवकेत तुलनेने घट झाल्याने दरात वाढ झाली होती. परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून १७ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ४ ट्रक, गुजरात येथून भुईमूग सुमारे १०० गोणी, मध्यप्रदेशातून मटार सुमारे ३० ट्रक, मध्यप्रदेशातून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १३०० पोती, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, फ्लॉवर १५ टेम्पो, गवार १० टेम्पो, पावटा १० टेम्पो, हिरवी मिरची ८ टेम्पो, कांदा सुमारे २०० ट्रक आवक झाली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News) बाजारभाव (Market Prices)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या