नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाच्या आवकेत घट झाली. दरांत वाढ झाली आहे. आवक ११२ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल १५००० ते २२५०० असा दर मिळाला.  चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ७७८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५५० ते ५५०० दर मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले.

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

बटाट्याची आवक ९८९० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २३०० दर होते. अद्रकाची आवक १४८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ६००० दर मिळाला. सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ६१६४ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १६०० दर मिळाला.

नवीन वर्षात सकारात्मक राहण्याचे पाच सोप्पे उपाय

घेवड्याला प्रतिक्विंटल २२०० ते ३५०० दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ७७० क्विंटल झाली. मागणी कमी असल्याने दर कमी होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १६०० ते २५००, तर ज्वाला मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० दर मिळाला. वाटण्याची आवक १९७० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २३०० ते ३१०० दर मिळाला.