🕒 1 min read
तेल आयातीवर लादलेले निर्बंध आणि वाढवलेल्या आयातकराचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असून बाजारपेठेत एकप्रकारे सोयाबीनच्या दरात तेजी आलेली आहे. सोयाबीनचा भाव येत्या काही दिवसात पाच हजार रुपयांचाही टप्पा ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. सोयाबीनचा भाव सौद्यात ४३०० रुपये तर पोटलीत ४२०० च्या आसपास आहे. सोयाबीनचा हमीभाव ३७१० रुपये जाहीर झाला आहे.
नागपूरमध्ये २०१९ मध्ये ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या
देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादन ८० ते ८२ लाख टनच्या आसपास होईल असा अंदाज व्यक्त होतो आहे. उत्पादन घटीचा परिणाम सोयाबीनचा भाव वाढण्यावर होतो आहे. सोयाबीनचे भाव व पामतेलाचे दर यांचाही संबंध असतो. यावषीं पामतेलाचे भावही बाजारपेठेत वाढत आहेत. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने बाजारपेठेत वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदूषणमुक्त मिठी नदीमुळे मुंबई सुरक्षित – पर्यावरणमंत्री रामदास कदम
लातूरच्या कीर्ती उद्योग समूहाने २० जानेवारी २०२० रोजी ४६५० रुपये, २० फेब्रुवारी ४७०० रुपये, २० मार्च रोजी ४७५० रुपये असे खरेदीचे भाव जाहीर केले आहेत. चांगल्या गुणवत्तेचे सोयाबीन बाजारपेठेत कमी येत असल्याने पुढील वर्षी सोयाबीन बियाणांचे भावही चांगलेच वाढतील, असा अंदाज कीर्ती समूहाचे प्रमुख अशोक भुतडा यांनी व्यक्त केला आहे.
वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ https://t.co/UgkiFbIktW
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019
‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही’ https://t.co/9ovJ613Qeo
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





