राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार

राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार असून, यासाठी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  ग्रामविकासाच्या दृष्टीने सरपंचांना यापुढे काही प्रमाणात प्रवासभत्ता, मोफत मोबाईल सुविधा व काही प्रासंगिक स्वरूपातील भत्ते व अन्य सुविधा देण्याबाबतचा निर्णयही परिषदेत होण्याची शक्‍यता जयंत पाटील यांनी वर्तविली.

शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत शिर्डी येथे 31 जुलै रोजी होणाऱ्या सरपंच परिषदेत सरपंचांना मानधनवाढीची भेट मिळण्याची शक्‍यता आहे. राज्यातील 28 हजार सरपंचांना याचा लाभ होणार असून, दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याचे आश्‍वासन शासनातर्फे देण्यात आल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत  राज्यात एकूण 27 हजार 906 ग्रामपंचायती आहेत. सध्या दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावच्या सरपंचांना 1 हजार रुपये, दोन हजार ते आठ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या सरपंचांना 1500 रुपये आणि आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावच्या सरपंचांना 2 हजार रुपये मासिक मानधन मिळते.

महत्वाच्या बातम्या –

‘शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा’ – धनंजय मुंडे

मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी सर्व यंत्रणा सज्ज – चंद्रकांत पाटील