संत्री खाण्याचे हे आहेत फायदे नक्की वाचा

  • रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते.
  • संत्र्याच्या मोसमामध्ये याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो. डाएटिंग न करताही संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येणे शक्य आहे. संत्र्याचा रस प्यायल्याने गर्भवतीच्या उलटय़ा व मळमळ ही लक्षणे दूर होतात. म्हणून सकाळ-संध्याकाळ १-१ कप संत्रारस गर्भवती स्त्रीने प्यावा तसेच मळमळीची भावना कमी व्हावी म्हणून संत्र्याची साल हुंगावी.
  • कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे या शरीररक्षक अन्नघटकांनी संत्रे परिपूर्ण असल्याने निरोगी राहण्यासाठी व शरीराच्या वाढीसाठी संत्री बहुमोल आहे.
  • उन्हाळ्यामध्ये थकवा आणि तणाव अधिक प्रमाणात जाणवतो, त्यासाठी संत्र्याचे सेवन केल्याने यावर गुणकारी ठरते. लघवीला जळजळ होत असल्यास संत्र्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. संत्र्याच्या सेवनाने रुक्ष, काळवंडलेली त्वचा मऊ व मुलायम बनते.

महत्वाच्या बातम्या –

हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार, घ्या जाणून……

आरोग्यासाठी फायदेशीर जवस

पाच वर्षातील कामाचे मूल्यमापन करूनच विद्यमान आमदारांना तिकीट – मुख्यमंत्री

मध्य महाराष्ट्रासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज