पिंपरी चिंचवडच्या मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा

यंदा कांद्याने रडवल असेल तरी शेत्र्याना थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता
पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला, आहे भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कउस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिलत आहे.

मार्केट यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला पाणचट अत्यंत सुमार दर्जाचा असल्याने व्यापारी वर्गात कुजबुज.या परदेशी कांद्याचा दर 30 रुपये किलो असा या कांद्याला प्रती किलोला दर मिळाला; तर आपला भारतीय गावरान कांदा प्रतवारीनुसार 35 ते  40 रुपयांना विक्री झाला.चाकण मार्केट मध्ये गावरान देशी कांद्याची आवक होत असून ४० रुपये पर्यंत गावरान कांद्याला प्रतीकिलोला दर मिळतोय.चाकण मार्केट मध्ये एक कंटेनर  तुर्कस्तानच्या कांद्याची आवक झालीय. शासनाने कांद्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अन्य देशातून कांद्याची आयात करण्याचे धोरण अवलंबले होते.

त्यामुळे भारतात आलेल्या  तुर्कस्तानच्या कांद्याची खरेदी करून तो चाकण मार्केट मध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे. दरम्यान डाळिंबसारखा दिसणारा आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला मात्र अत्यंत सुमार दर्जाचा असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. ३० रुपये असा या तुर्कस्तानच्या  कांद्याला प्रती किलोला दर मिळाला. चव आणि गुणवत्तेच्या बाबत भारतीय कांदाच सरस असल्याचे दिसून आलेय.