शेतकऱ्यांची दुसरी कर्जमाफीची यादी उद्या जाहीर करणार

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

आदिवासींचे जीवन बदलविणाऱ्या योजना कालबद्ध रितीने राबविणार- उद्धव ठाकरे

दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत त्यांच्यासाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यासोबतच शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहिला पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यात सर्वाधिकार मिळणार – भगत सिंह कोश्यारी

तसेच या सरकारकडून राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध झाली. आता सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. २८) प्रसिद्ध केली जाणार आहे.

पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले, ते पाहावे – अमोल कोल्हे

तसेच काही शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतही त्रुटी असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. सेवा केंद्रातून त्यात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करावी, असे आवाहन देखील अधिकाऱ्यांनी केले आहे. पोर्टलवर याद्या अपलोड करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने याद्या प्रसिध्दीस विलंब होत आहे. याद्या अपलोड होतील तसा लाभ देण्यात येत असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच राज्यातील ६८ गावांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम

कृषी, जल व्यवस्थापन, सिंचन क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी इस्त्रायलशी सहकार्य – उद्धव ठाकरे