आत्महत्येची परवानगी द्या’; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिल्हाधिकारी कार्यालय बीड

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनेक चकरा मारल्या. मात्र बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे देत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन ‘पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?’ असा प्रश्न विचारला आहे. अनेक महिन्यांपासून शेतकर्‍यांची हेळसांड होत असल्याने शेतकऱ्यांना आता चक्क आत्महत्या करण्याची परवानगी मागण्याची वेळ आली आहे.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रूड जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावातील हजारो शेतकरी एकत्र आले. आणि विमा कंपनीच्या गलथान कारभाराला वैतागत थेट जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना आत्महत्येच्या परवानगीची मागणी केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

जालन्यातही धरण फुटण्याची भीती; प्रशासनाने लावली ताडपत्रीची ठिगळं

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?

Add Comment

Click here to post a comment
Loading…