Share

हळद घातलेलं दूध का प्यावे? जाणून घ्या फायदे

Published On: 

🕒 1 min read

हळदीचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. हळदीचे दूध हिवाळ्यात रोज प्यायल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. ह्ळदीपासून आपल्या शरीराकरता कोणते इतर देखील फायदे असणार आहे ते आपण पाहणार आहोत.
हळद घातलेले दुध किंवा हळदीचे दुध अनेक आरोग्यकारी गुणांनी युक्त आहे. हळदीमध्ये असलेल्या अँटी बायोटिक प्रॉपर्टीज आणि दुधामध्ये असलेले कॅल्शियम यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधींपासून संरक्षण मिळते.

चला तर मग घ्या जाणून का प्यावे हळद घातलेले दूध –

  • आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते.
  • लहान मुलांसाठी हळदीचं दूध अतिशय फायदेशीर मानलं जातं. हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. जो हाडं मजबूत करण्यास मदत करतो. यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.
  • हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो.
  • हळदीचं दूध आर्थराइटिसवरही गुणकारी ठरु शकतं. या दुधामुळे आर्थराइटिसमुळे येणारी सूज कमी होण्यास मदत होते.
  •  हळदीचं दूध अॅन्टी-मायक्रोबायल आहे. जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्याचं काम करतो. हळदीचं दूध श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही मदत करतं. कारण या दूधाच्या सेवनाने शरीरातील तापमान वाढतं, त्यामुळे फुफ्फुस कंजेशन, सायनस, अस्थमा यांसारख्या समस्यांमध्ये फायदा होऊ शकतो
  • या दुधामध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असतात. जे सर्दी, खोकला आणि घशाच्या दुखण्यापासून आराम देण्यास मदत करतात.
महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या