शाळा ,कॉलेज सुरु होणार का? याबात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

मुंबई –  मागील काही दिवसापासून  कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले असून शाळा ,कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आजच्या मंत्रीमंडळ (Cabinet) बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात तसेच शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावे असा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे.  त्यामुळे सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –