🕒 1 min read
नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan) योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला गेला आहे. १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केला गेला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेत मोदींनी केला मोठा बदल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारने नियम बदलले आहेत. आता पीएम किसानच्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शिधापत्रिका क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
पीएम किसान (PM Kisan) योजनेसाठी आता ‘हे’ कागदपत्र द्यावे लागेल ….
जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.
पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता….
येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्यांना देण्यात येणार्या वार्षिक रकमेत वाढ होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्यांना वार्षिक 6,000 रुपये देते. आता या बजेटमध्ये ही रक्कम वाढवली जाऊ शकते. यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्यांना वार्षिक 6,000 रुपये देते मात्र आता ही रक्कम आता ८००० एवढी केली जाऊ शकते. देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर देशातील शेतकर्यांचा शेतीचा खर्च वाढला आहे. डिझेल ते खते आणि बियाणांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे. तसेच शेतकऱ्यांवर अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. यामुळे याबाबत मोदी सरकार विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा – यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा. मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान विभागाचा अंदाज: राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होणार
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण
- तूर डाळीचे दर शंभरी गाठणार
- ‘चंदन शेती’ करोडोचे उत्पन्न देणारे पीक? सत्य कि अफवा !
- तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित नको – सुनिल केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २९ साखर कारखाने सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





