अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर

अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अळशी खाण्याचे  शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अळशीमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.

– अळशीमध्ये प्रोटीन असल्याने ते महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे.

आरोग्य संतुलित राहण्यासाठी हे आहेत बीटाचे फायदे

– अळशीच्या सेवनाने महिलांचा मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास मदत होते.

– दररोज अळशी खाल्ल्याने संधीवात, सांधेदुखीमध्येही आराम पडतो. हाडं मजबूत होण्यास मदत होते.

– अळशीमध्ये लिगनेन असतं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोज थोडी अळशी खाल्याने मधुमेह होण्याचा धोका अतिशय कमी होतो.

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

– अळशीमध्ये ओमेगा-३ असतं जे, बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतं.

– अळशीमुळे पचनशक्ती चांगली, सुरळित राहते. शरीराला उर्जा मिळते. अळशीमध्ये फायबर असतं, जे पचनशक्ती सुधारतं.