Share

पपई खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

Published On: 

🕒 1 min read

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषक तत्व असलेल्या पपईचा त्वचेला जसा फायदा होता. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

पपई खाण्याचे फायदे :

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते –
    आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.
  • डोळ्यांचे आरोग्य सुधारते –
    पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.
  • शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते –
    पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.
  • मधुमेहींसाठी गुणकारी –
    पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.
  • वजन घटवण्यास मदत होते –
    एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.
  • सांधेदुखीपासून आराम मिळतो –
    पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.
  • पचन सुधारते-
    आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.
  • कर्करोगापासून बचाव होतो- 
    पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.
  • ताण-तणाव कमी होतो –
    दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या