Share

जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देणार – बाळासोब थाेरात

Published On: 

जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देणार – बाळासोब थाेरात

🕒 1 min read

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. तर मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पिक निघून गेले. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे.

तर आता महसूल मंत्री बाळासोब थाेरात यांनी सांगितले की, ‘राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेला शेतक-यांना १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे.’

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
राजकारण (Politics)बातम्या

Join WhatsApp

Join Now
जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देणार – बाळासोब थाेरात

🕘 संबंधित बातम्या