कोथिंबीरचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. पण कोथिंबीरची स्वतःची अशी एक वेगळी चव असते जी, पदार्थाला एक स्वाद आणते. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. खाण्याला ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वाद आणते तशीच तुमच्या आरोग्यालासाठीदेखील कोथिंबीर तितकीच गुणकारी आहे.

कोथिंबीरीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहीत आहे का कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात. चला मग जाणून घेऊया कोथिंबीर खाल्याने तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात.

  • कोथिंबीर खाल्ल्याने आपल्या शरीरात ‘विटामिन ए’ ची कमतरता होत नाही ज्यामुळे आपले डोळे नेहमी चांगले राहतात.
  • कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यानं अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो
  • अनेकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलला सतत वाढत राहतं. त्यामुळे यावर अनेक उपाय शोधत असतात. कोथिंबीर आपल्या शरीराला हानी पोचवणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करून आपल्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल ला वाढवण्यास मदत करते.
  • कोथिंबीर ही मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. कोथिंबीरची पाने मज्जासंस्था सक्रिय ठेवण्यात खूप फायदेशीर आहेत.
  • त्वचेवरील रोग, जसे की मुरुम, ब्लैकहैड्स आणि कोरडी त्वचा यांसारख्या अनेक त्वचेच्या समस्या कोथिंबीर खाल्ल्याने दूर होऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या –