Share

पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन

Published On: 

पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन

🕒 1 min read

मुंबई – पुणे जिल्ह्यामध्ये १३ खासगी तर १६ सहकारी  साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये ११५.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील साखर उतारा १०.०४ टक्के आहे.

महाराष्ट्रात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ११ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने  उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ५६४.३३ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ११ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल ५५५.५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.८४  टक्के इतका आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
साखर (Sugar)बातम्या

Join WhatsApp

Join Now
पुणे जिल्ह्यामध्ये ११५.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन

🕘 संबंधित बातम्या