Share

देशात गेल्या २४ तासात 6 हजार 531 कोरोनाबाधितांची नोंद; ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

देशात गेल्या २४ तासात 6 हजार 531 कोरोनाबाधितांची नोंद; ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (corona ) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे५७८ रुग्ण आढळून आले आहेत.

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona ) 6 हजार 531 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे (corona ) ३१५ लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 75 हजार 841 वर पोहोचली आहे.  आतापर्यंत देशात तब्बल  4 लाख 79 हजार 997  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर देशात गेल्या २४ तासात 7141 कोरोनारुग्ण कोरोनमुक्त झाले आहे, तर देशात आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 37 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्य

Join WhatsApp

Join Now
देशात गेल्या २४ तासात 6 हजार 531 कोरोनाबाधितांची नोंद; ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

🕘 संबंधित बातम्या