Share

रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

Published On: 

रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

🕒 1 min read

आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून सफरचंद हे फळ मानले जाते.  मधुर, आंबट चवीचे सफरचंद हे बऱ्याच अंशी पूर्ण असल्याने आरोग्यसंरक्षक फळ मानले गेले आहे. ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’ हे बोधवाक्य सफरचंदाची महती विशद करते.     सफरचंद हे रोझेसी कुळातील फळ असून मूळचे पूर्व युरोपातील आणि पश्चिम आशियातील आहे. भारतात सफरचंदाचे उत्पादन मुख्यत्वे करून काश्मीर, कुलू-मनाली या थंड व डोंगराळ प्रदेशात घेतले जाते. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते.
  • रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल.
  • केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.
  • सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते.
  • सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
  • सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्यविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या