जाणून घ्या काय आहेत डाळिंब खाण्याचे फायदे…

डाळिंबाला आयुर्वेदात खूप महत्त्व स्थान आहे. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाची ओळख आहे. तरीही अनेकदा आपण डाळिंब सोलण्यामुळे खायचा कंटाळा करतो पण डाळींबाविषयी खालील काही गोष्टी जाणून घेतल्या तर डाळींब सोलण्याचा कंटाळा तुम्ही करणार नाहीत…

  • ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
  • डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
  • अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
  • रोगप्रतिकारकशक्ती सुधारते – दाहशामक गुणधर्म असल्याने डाळींबामुळे कमजोर रोगप्रतिकार शक्तीमुळे बळावणारे वातविकार कमी होण्यास मदत होते. डाळींबामधील व्हिटामिन सी शरीरातील अ‍ॅन्टिबॉडीची निर्मिती व वाढ सुधारते. परिणामी विविध संसर्गांपासून आपला बचाव होतो.
  • ब्लड प्रेशर कमी होतो – डाळिंबामुळे कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते परिणामी रक्तदाबही सुधारतो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता देखील कमी होते.
  • हृदयविकाराची समस्या कमी होते – डाळिंबामध्ये आढळणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स शरीरात पसरणार्‍या फ्री रॅडीकल्सचा त्रास कमी करते. डाळिंबामुळे फ्री रॅडीकल्सचा रक्त धमन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रेरॉलचेही प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • कॅन्सरचा धोका कमी होतो –  प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर, स्तनांचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग व त्वचेचा कर्करोग कमी होण्यासाठी डाळींब खाणे फायदेशीर आहे.
  • अल्झायमरची शक्यता कमी होते – डाळींबामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. अल्झायमर सारख्या आजारामध्ये विसरभोळेपणा वाढण्याचा त्रास अधिक असतो. अशावेळी डाळींब खाणे हितकारी ठरते.
  • तरुण दिसण्यास मदत होते – वयोमानानुसार त्वचेवर सुरकुत्या का पडतात हे तुम्हांला ठाऊक आहे का? यामागील एक कारण म्हणजे फ्री रॅडिकल्समुळे पेशींचे होणारे नुकसान. डाळींबामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स असल्याने एजिंगची क्रिया कमी होते.
  • पचन सुधारते – पचनाचे विकार दूर ठेवण्यासाठी तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असणे गरजेचे आहे. अरबट चरबट आणि जंकफूड खाण्यामुळे फायबर शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. नियमित डाळींब खाल्ल्याने दिवसातील 45% गरज पूर्ण होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

साखर उद्योगाला सरकारनं मदत करणं अशक्य आहे; पर्यायाचा विचार करा – गडकरी