Share

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात खायला हवा चिकू, जाणून घ्या फायदे

Published On: 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात खायला हवा चिकू, जाणून घ्या फायदे

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून घेऊया काय आहेत चिकू खाण्याचे शरीराला फायदे. थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही असलेल्या व्यक्तींनी रोज एक चिकू खाणं आवश्यक आहे.

  • डोळ्यांसाठी चिकू खाणं फायदेशीर असतं. दृष्टी चांगली होते. यासोबत चिकूतील पोषक तत्व शरीरातील अनेक इन्फेक्शन होण्यापासून दूर ठेवतात
  • कफ आणि श्वासनासंबंधी आजार दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो. सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते. चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.
  • ताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.
  • सुक्यामेव्या सोबत म्हणजेच ड्राय़फ्रूटसोबत सुकवलेला चिकू रोज सकाळी खाल्ला तरीही शरीराला फायदा होतो.
  • शक्यतो चिकूचा मिल्कशेक घेण्यापेक्षा नुसतं फळ म्हणून चिकू खाल्ला तर त्यापासून शरीराला मिळणारे व्हिटॅमिन्स आणि होणारे फायदे अधिक आहेत.
  • हिवाळ्यात चिकूचा आहारात समावेश केला तर पोटाच्या विकारांपासून सुटका मिळू शकते. यासोबतच शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात खायला हवा चिकू, जाणून घ्या फायदे

🕘 संबंधित बातम्या