जनावरांसाठी खाकी वर्दीतला माणूस पोहोचला गोठ्यात

एका शेतकऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या वडील व पत्नी यांनाही शासकीय यंत्रणेने ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यामुळे घरात इतर कोणीही नसल्याने वस्तीवरील जनावरांचा चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने टेंभुर्णी पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

माढा तालुक्यातील अकोले येथील एका व्यक्तीचा अकलूज येथे उपचार घेत असताना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर या व्यक्तीवर पुणे येथे उपचार चालू होते. यामुळे या व्यक्तीचे वडील, पत्नी व नोकर यांनाही शासकीय यंत्रणेने कोरोना चाचणी करण्यासाठी  कुर्डूवाडी येथील  शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या व्यक्तीच्या घरी किंवा शेतात जाण्यास गावातील कोणीही धजावत नव्हते. ही माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना समजताच  त्यांनी तत्काळ तीन-चार  पोलीस कर्मचाºयांना या व्यक्तीच्या शेतात पाठवून तेथील जनावरे, शेळ्या व  कोंबड्या यांच्या चारापाण्याची व्यवस्था करून मुक्या प्राण्यांना दिलासा देण्याचे काम केले.

 महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे