कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

परतीच्या पावसानमुले शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मंडळनिहाय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी कृषी अधिकारीमार्फत अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जावून नुकसानीची पाहणी करण्यात आली.

तालुकाप्रमाणे दररोज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल मागितले जात आहे. पिकांच्या पंचनाम्याचे काम हे अंतिम टप्यात आले आहे. भंडारा तालुक्यात मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषीमित्र व गावचे स्थानिक पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मदतीने नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यात अंदाजे आठ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकरी भरपाई मिळण्यासाठी मदतीची मागणी करीत आहेत.

भंडारा तालुक्यातील ३८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान उपसंचालकांसह काही अधिकारी व कर्मचारीसुद्धा उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याची माहिती कृषी अधिकारी मिलींद लाड यांनी दिली. हे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तसेच आयुक्त उपसंचालकांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. कृषी आयुक्त कार्यालयातील उपसंचालकांनी बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अनेक नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. बळीराजावर मोठे संकट ओढवले असून त्याला नुकसान भरपाईची खूप गरज आहे. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

महतवाच्या बातम्या –

पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसोबतच हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी – काँग्रेस

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

स्वाधार योजने’चा आतापर्यंत ३५ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लाभ – डॉ.सुरेश खाडे

‘पाणी पुरवठ्यात अडचण येत असेल तर मला सांगा, आज सरकार मीच आहे’