गवार पिकासाठी अनुकूल हवामान आणि जमीन, जाणून घ्या

गवार

गवार हे उष्ण हवामानातील पिक असून सरासरी १८ ३० अंश सेल्सिंअस तपमानास हे पिक उत्तम येते. खरीपातील उष्ण व दमटहवेमुळे झाडांची वाढ चांगली होते.

हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ७.५ ते ८ च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.

गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगमास गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. बियांचे प्रमाण हेक्टरी १४ ते २४ किलो बी लागवडीस पुरेसे असते. बियाण्यास पेरणीपूर्व १० ते १५ किलो बियाण्यात २५० ग्रॅम रायझोबियम चीलावे.

गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरी भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी ५० किलो नत्र, ६० किलो पालाश द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पिकला पाणी माफक प्रमाणत लागते परंतु फुले आल्यापासून शेंगाचा बहार पुरण होइपर्यत नियमित पाणी द्यावे.

महत्वाच्या बातम्या –