Share

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा, प्रतिहेक्टरी मिळणार अवघे ८ हजार रुपये

Published On: 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा, प्रतिहेक्टरी मिळणार अवघे ८ हजार रुपये

🕒 1 min read

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मराठवाड्यातील तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई मदतरूपात देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज पडणार आहे. पिकांचे पंचनामे करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती मदत करावी लागेल, याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सादर केला आहे. पीकस्थितीचे नुकसान लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी बांधावर भेटी सुरू करताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. यानंतरच पंचनाम्याला देखील गती आली.

यंदाच्या खरिपात ५० लाख २० हजार ५९१.६६ हेक्टरवर खरिपाची प्रत्यक्ष पेरणी झाली होती. या क्षेत्रापैकी ४० लाख ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायत, तर ३२ हजार हेक्टरवरील फळपिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या नियमांच्या अधीन राहून २९०४ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी अनेक प्रकल्पांना चालना – गिरीष महाजन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या

Join WhatsApp

Join Now
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा, प्रतिहेक्टरी मिळणार अवघे ८ हजार रुपये

🕘 संबंधित बातम्या