Share

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 56 टक्क्यांनी वाढ; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात कोरोनाचे (Corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना(Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात बुधवारी 58 हजार 97  कोरोना नवीन रुग्ण आढळले होते. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  90 हजार 928  कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासात 325 लोकांचा मृत्यू झाला.  दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच   गेल्या २४ तासात 19 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3 कोटी 43 लाख 4 हजार 119  रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख 85 हजार 401 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत4 लाख 82 हजार 876  लोकांचा मृत्यू झाला आहे.  देशात आतापर्यंत 145 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या