राज्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ; वाटाणा प्रति किलो १०० रुपये

नवी दिल्ली – इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला, वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

टोमॅटोच्या दरासह वाटाण्याचे दर प्रति किलो 100 रुपये झाले आहेत. अवकाळी पावसाचा मोठा परिणाम शेतीमालावर झाला आहे आणि याचाच सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसला आहे. यामुळेच सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. याचा परिणाम दरावर झाला असून, पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या –