Share

राज्यात ०२ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २३६.१३  लाख टन उसाचे गाळप तयार

Published On: 

राज्यात ०२ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २३६.१३  लाख टन उसाचे गाळप तयार

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात  ०२ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८६ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात ०२ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २३६.१३  लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे.

राज्यात  ०२ डिसेंबर पर्यंत तब्बल २१७.११  लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१९ टक्के इतका आहे.

राज्यात  ०२ डिसेंबर पर्यंत सर्वाधिक ४१ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात  ०२ डिसेंबर अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ५५.१० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ४५.६९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा ८.२९ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
साखर (Sugar)बातम्या

Join WhatsApp

Join Now
राज्यात ०२ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २३६.१३  लाख टन उसाचे गाळप तयार

🕘 संबंधित बातम्या