कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना छगन भुजबळ यांच्या हस्ते पाच लाखाचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण

नाशिक – कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण दहा अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासनाने जाहिर केलेल्या पाच लाखाच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वश्री आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार,डॉ. राहुल आहेर,सरोज अहिरे,जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ.सुशील वाघचोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे उपस्थित होते.

कोरोना संसर्गात ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहे, अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी व संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे आवश्यक होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील जवळपास 38 बालकांना महिला व बाल विकास विभागामार्फत पाच लाखाच्या मुदतठेव प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास प्रयत्न : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

कोरोना महामारीत ज्या मुलांचे आई वडील दुर्दैवाने दगावले अशा बालकांचे दुःख फार मोठे आहे. मात्र आपल्या समाजात अशा बालकांना त्यांच्या वडिलांकडील नव्हे तर आई कडील नातेवाईक धीर देत आहेत, त्यांना सांभाळत आहेत. भविष्यात या मुलांचा आपल्या

वडिलांकडील स्थावर मालमत्तेवर जो हक्क आहे तो अबाधित राहावा, यासाठी तालुका प्रशासन तहसीलदार यांच्यामार्फत पाठपुरावा करुन अशा बालकांना त्यांचा हक्क मिळवून देणात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी सांगून सदरचा उपक्रम राबविणारा नाशिक जिल्हा एकमेव असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळांना दिली आहे.

आरोग्य शिक्षण संवाद संपर्क पुणे विभागाचे सन्मान चिन्हांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

कोरोना महामारीत साथरोग नियंत्रणासठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संचालक आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण संवाद संपर्क विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त सन्मान चिन्हाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य परिमंडळाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.सुशील वाघचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, सरिता खैरे, अर्चना जोशी, प्रशांत केळकर आणि सुरेश जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –