विकास कामे पूर्ण करण्यासोबतच नागरिकांनी स्वच्छतेवर भर द्यावा – छगन भुजबळ

नाशिक – कोरोना अद्याप संपलेला नाही, परंतु प्रार्दूभाव काही प्रमाणात कमी झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असून अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे. शहरातील विकास कामे पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांनी स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील जहागीरदार कॉलनी, कोर्ट रोड व शाह कॉलनी, मिलन रोड येथे अल्पसंख्यांक विकास योजने अंतर्गत विकासकामांचे भूमिपुजन व उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, येवला नगरपालिकेचे गटनेते प्रवीण बनकर, बांधकाम सभापती निसार अहमद सगीर अहमद, नगरसेवक निसार लिबुवाले, शफीक लिंबुवाले, नगरसेवक दिपक लोणारी, अकबर शहा, मुश्ताक शेख, मलिक मेमबर, मुख्याधिकारी संगिता नांदूरकर, सहायक कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना काळातही विकास कामे अविरतपणे सुरू आहेत. शहरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी शासन सर्वोतोपरीने मदत करीत आहे. विकास कामांसोबतच नागरिकांनी आपले आरोग्याची काळजी घेणे सुध्दा

महत्वाचे असून, लसीकरणाबाबत कोणतीही भिती मनात न बाळगता त्वरीत प्रत्येकाने कुटूंबासह लसीकरण करून नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीच्या पालनात सातत्य ठेवावे. त्याचबरोबर डेंग्यू, चिकनगुनिया व इतर साथरोगांचा धोका टाळण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवून नगरपालिका प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सण साजरा करतांना आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, असे सांगुन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

या विकास कामांचा झाला शुभारंभ:

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जहागीरदार कॉलनी, कोर्ट रोड येवला येथील अल्पसंख्यांक विकास योजने अंतर्गत कोर्ट व जुनी तहसिल रस्ता काँक्रिटीकरण करणे, पाकीजा एसटीडी ते जुनेशभाई यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, मोमीनपुरा भागातील समाजमंदिर ते इकबाल मौलवी जनाब ते निसारभाई मेंबर ते सादतभाई मिठाईवाले रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, मुश्तादकभाई शेख यांच्या घरापासुन ते आईना मस्जिद पर्यंत काँक्रिटीकरण करणे, नांदगांव रोडपासुन ते रफिकभाई कुरेशी यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण, डॉ. अन्विर यांच्या घरापासुन ते फारुक चमडेवाले यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, अन्वधर अब्दुल भंगारवाले ते दस्तुगीर चंदु यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, वाहीद पुढारी ते जि.प. शाळा नं. 3 पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, शकील भाई यांच्या घरापासुन ते अन्वरभाई मुर्गेवालेपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, शाहरुखभाई यांच्या घरापासुन ते रियाजभाई कोंबडीवाले यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, मोमीनपुरा भागातील हाफीज जनाब यांच्या घरापासुन ते वाहीद यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, नांदगांव रस्त्यावरील पाणी टाकी ते आजु भंगारवाला यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, मोठे कब्रस्तापन येथे अंतर्गत रस्ते व अनुषांगिक कामे करणे जागीरदार कॉलनी येथील कोर्ट रोड ते विजडम हायस्कुल पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण या कामांचे भुमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.

तसेच शाह कॉलनी मिलन पार्क येवला येथील अल्पसंख्यांक विकास योजने अंतर्गत येवला येथील मिलन हाऊस ते सलिम मंडपवाले यांच्या घरापर्यंत, परदेशपुरा मस्जिद ते शिराजमामा यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, कमानीपुरा भागातील इसराईल यांच्या घरापासुन ते जाफर पहिलवान यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, चावल गल्ली ते पंच शेख इब्राहीम शेख हाशल यांच्यात घरापर्यंत रस्ता  काँक्रिटीकरण करणे, परदेशपुरा भागातील हुसेन

दगडु यांच्या  घरापासुन ते सगीर शेख केळेवाले ते परदेशपुरा मस्जिदपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, जावेद सर यांच्यात घरापासुन ते ब्राईट मस्जित यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, शकील टेम्पोवाला यांच्या  घरापासुन ते येशू जनाब यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, स.नं. 155 रस्याशकीचे काँक्रिटीकरण करणे, छोटे कब्रस्तान येथे अंतर्गत रस्ते व अनुषांगिक कामे करणे, राजुभाई फ्रुटवाला यांच्या घरापासुन ते जब्बार हाफिस यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भुमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –