निशिगंध फूलशेतीमुळे सापडला आर्थिक समृद्धीचा मार्ग

औरंगाबाद – कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक हे कोणाला नको असते. पण हवामान बदलामुळे पारंपरिक पीक पद्धती हे मारक ठरत आहे. जर यावर आपल्याला मत करायची असेल तर कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक आपल्याला शोधावे लागेल. पण फक्त पीक शोधून काहीही होणार नाही तर त्याची लागवड करणे , त्याचे पाणी व्यवस्थापन ,त्यांची खते यावरही लक्ष द्यावे लागेल. याबाबत कृषी शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांना माहिती देत असतात.

अशाच प्रकारे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फुलशेतीविषयी लेख प्रसिद्ध केला होता.त्या लेखाचे वाचन संजय यांनी केले व निशिगंध फूलशेती करण्याचे ठरवले. पण त्यांनी हे ठरवले त्यातही त्यांना आर्थिक चणचण होती. पण त्यांनी हार मानली नाही.संजय यांनी त्यांचा किनगावचा मित्र दत्ता तावडे यांची मदत घेतली. उधारीवर लागवडीसाठी बेणं आणले व बदनापूर कृषी संशोधन विभागाचे प्रमुख तथा कृषी शास्त्रज्ञ आचार्य डॉ. संजय पाटील, कृषी शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे व फूलशेती करणारे मित्र तावडे यांच्या सल्ल्याने २०१७ मध्ये २० गुंठ्यात निशिगंध फुलशेती करण्यास सुरुवात केली.

संजय यांनी स्वत: शेती पिकवणे व विक्रीचेदेखील नियोजन केले. जसेजसे फूल परिपक्व झाले तसेतसे त्यांनी औरंगाबादमध्ये स्वत: विकण्यास सुरुवात केली. यामुळेमध्ये येणाऱ्या दलालीला चाप बसला व उत्पन्नात वाढ करणेदेखील त्यांना शक्य झाल्याचे ते सांगतात. गत दोन वर्षांत त्यांना २ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. पण

यंदा पाण्याच्या अडचणीमुळे दहा गुंठे क्षेत्र कमी करून केवळ १० गुंठे क्षेत्रातच लागवड केली होती. कारण कमी पडलेल्या पावसामुळे ते जास्त पीक घेऊ शकले नाही. तसेच पूर्ण सीझनमध्ये ३० हजार रुपये महिना मिळाल्याचे संजयचे म्हणणे आहे.संजय यांच्याकडे फक्त दीड एकर शेती आहे. त्यात निशिगंध १० गुंठे घेतले. त्यासोबतच सहा गुंठ्यात शेवगा आंतरपीक म्हणून घेतले. ३० गुंठ्यात मका तर दहा गुंठ्यात यंदा बिजली फूलशेतीला प्राधान्य दिले आहे. विशेषत: निशिगंध फूलशेतीमुळे त्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या –

साथीच्या आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य खात्याचे नवीन पाऊल

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरत – सुभाष देशमुख