Share

धोका वाढला! देशात एकाच दिवशी तब्ब्ल ‘इतक्या’ कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona ) 27 हजार 553  नवीन रुग्ण आढळले आहेत. 284 लोकांचा मृत्यू झाला. देशात सध्या १ लाख 22 हजार 801  सक्रिय रुग्ण आहेत.  तसेच 3 कोटी 42 लाख 84 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 81 हजार 770  जीव गमावला संख्या आहे. देशात आतापर्यंत 145 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.

ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या जवळपास 1525 जवळ पोहोचली आहे. 2३ राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 460 रुग्ण, दिल्लीत 351 रुग्ण तर गुजरातमध्ये 136 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या