काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासात 11,877 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई –  राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० दिवसापासून राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 11,877 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत रविवारी 8 हजाराहून अधिक कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. राज्यात गेल्या २४ तासात 50 ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे.  राज्यात ओमायक्रॉनची संख्या ५१० वर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या –