Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ‘या’ भाज्यांचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: थंडीच्या ऋतूमध्ये लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे आरोग्याला जास्त धोका निर्माण होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोक आपल्या आहारामध्ये अनेक भाज्या आणि फळांचा समावेश करतात. भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना इजा होणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या शुगरच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने शुगर कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध केलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या आहारात काही भाज्या आणि फळांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. कारण रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

बीट

नियमित बीटचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळू शकतो. कारण डायबिटीसच्या रुग्णांसाठी बीट हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. नियमित बीटाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर बीटामध्ये उपलब्ध असलेले अल्फा ओलिक ॲसिड रक्तातील हाय ब्लड शुगर लेवल नर्वस सिस्टीमला मजबूत बनवते. त्यामुळे तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्ही हिवाळ्यामध्ये नियमित बीटरूटचे सेवन केले पाहिजे.

मुळा

मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यामध्ये मुळ्याचे सेवन करावे. कारण यामध्ये ग्लुकोसिनोलेट आणि आयसोथिओसायनेट सारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. या दोन्ही गोष्टी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर मुळा खाल्ल्याने तुमच्या शरीरात नैसर्गिक पद्धतीने अॅडिपोनेक्टिन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. हा हार्मोन इन्सुलिनच्या प्रतिकारापासून तुमचे संरक्षण करू शकतो.

गाजर

हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध होणारी गाजर ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक रामबाण इलाज करू शकते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक प्रमाणात उपलब्ध असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के, पोटॅशियम, फायबर आणि आयरन यासारखे घटक आढळतात. तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असला, तर तुम्ही गाजराची भाजी, कोशिंबीर आदी या स्वरूपात नियमित गाजराचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या