Breast Pain | महिलांनो लक्ष द्या! ब्रेस्ट पेन होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Breast Pain | टीम कृषीनामा: महिलांमध्ये ब्रेस्ट पेन ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. बहुतांश महिलांना मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी स्तनांमध्ये वेदना होऊ लागतात. त्याचबरोबर इतर अनेक कारणांमुळे देखील महिलांना स्तनदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे किंवा गर्भधारणे दरम्यान देखील ब्रेस्टमध्ये वेदना होतात. या वेदनेतून सुटका मिळवण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या औषधींचा उपयोग करतात. पण सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला पुढील घरगुती उपाय करू शकतात.

ॲपल व्हीनेगर (Apple Vinegar-For Breast Pain)

ॲपल व्हीनेगर स्तनदुखीसाठी एक सर्वोत्तम घरगुती उपचार आहे. ॲपल व्हीनेगर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलन नियंत्रणात राहते. स्तनदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा ॲपल व्हिनेगर मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. याचे सेवन केल्याने ब्रेस्ट पेनपासून तुम्हाला लवकर आराम मिळेल.

एरंडेल तेल (Castor oil-For Breast Pain)

ब्रेस्ट पेन दूर करण्यासाठी एरंडेल तेल एक उत्तम उपाय आहे. कारण एरंडेल तेलामध्ये अँटीइफ्लिमेंटरी गुणधर्म आढळून येतात, जे ब्रेस्ट पेन दूर करण्यास मदत करतात. ब्रेस्ट पेन होत असल्यास तुम्ही थेट ब्रेस्टला एरंडेल तेल लावू शकतात. तुम्ही दिवसातून दोन वेळा ही प्रक्रिया करू शकतात. एरंडेल तेलाच्या मदतीने तुम्हाला या वेदनेतून सुटका मिळू शकते.

बडीशेप (Fennel-For Breast Pain)

मासिक पाळी सुरू असताना स्तनांमध्ये वेदना होणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बडीशेपचे सेवन करू शकतात. बडीशेपमध्ये आढळणारे गुणधर्म हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. या वेदनातून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये बडीशेप उकळून घ्यावी लागेल. हे पाणी तुम्हाला अर्धे होईपर्यंत उकळावे लागेल. त्यानंतर हे पाणी तुम्हाला गाळून कोमट करून प्यावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला स्तनांच्या वेदनेतून आराम मिळेल.

आईस पॅक (Ice pack-For Breast Pain)

स्तनांमध्ये होणाऱ्या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आईस पॅकचा वापर करू शकतात. आईस पॅकच्या मदतीने ब्रेस्टवर आलेली सूज देखील कमी होऊ शकते. ब्रेस्ट पेनपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा आईस पॅक स्तनांवर लावू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Belpatra Leaves | बेलपत्राचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Green Coffee | वजन कमी होण्यापासून ते एनर्जी बूस्टरपर्यंत ‘हे’ आहेत ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे

Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश