पुदिना खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादि याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

पुदिना फायदे –

  • जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.
  • सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.
  • मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.
  • जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून  घेऊन लावा यामुळे जखम लवकर माठेल.
  • पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.
  •  उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे:-  कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.

महत्वाच्या बातम्या –