कोबी खा आणि निरोगी रहा, जाणून घ्या फायदे

काहींना कोबी खूप आवडते तर काही लोक कोबी पाहिला तर अनेक लोक नाक मुरडतात. परंतु कोबी ही आरोग्यास खूप खूप फायदेशीर असते. आपण कोबीचा उपयोग भाजीसाठी करत असतो. सूप बनविण्यासाठीही कोबीचा उपयोग केला जातो. पांढरट-हिरवा व लाल-जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत.

कोबीमध्ये कॅल्शिअय, फॉस्फरस, लोह, “क’ जीवनसत्व हे जास्त प्रमाणात आहेत, म्हणूनच कोबीचा आहारात आवर्जून समावेश करावा. कोबी निवडताना नेहमी पोकळ गड्डयापेक्षा कठीण घट्ट गड्डा निवडावा व भाजी करण्यापूर्वी तो दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

  • कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.
  • कोबीमधील पोटॅशियम एक महत्त्वपूर्ण खनिज आणि इलेक्ट्रोलाइट आहे. हे हृदय गती आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या नकारात्मक परिणामाविरूद्ध रक्तवाहिन्या भिंतींना आराम देते आणि लघवीद्वारे सोडियम तयार करण्यास मदत करते. लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी कोबीमधील मॅंगनीज देखील आवश्यक आहे.
  • हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.
  • तुम्हाला तुमची भूक क्षमवायची असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही कोबी खाच. १०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धन आहे.
  • कप होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते.  बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.
  • कोबीमध्ये डोळ्यातील आजार रोखणारे अँटीऑक्सिडेंट असतात. यात बीटा कॅरोटीन आहे, जे व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित करते आणि डोळ्याच्या आरोग्यास फायदे देते. व्हिटॅमिन ए डोळ्यांना बळकट करते, रात्रीच्या दृश्यासाठी कार्ये सुधारित करते आणि डोळ्यांची वृद्धिंग रोखते.

महत्वाच्या बातम्या –