‘या’ घरगुती उपायांनी ‘5’ मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास, जाणून घ्या

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त उसळले की पोटात जळजळ, छातीत जळजळ होते.

उलटीने माणूस हैराण जातो. पित्त होण्याची करणे आजकाल की अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट खाणे, फास्ट फूड खाणे, रात्रीची जागरणे, खूप काल उपाशी राहणे, वेळी-अवेळी खाणे, मसालेदार खाणे, चहा जास्त पिणे. मग पित्तावर उपाय म्हणून अँटासिड घेण्यात येतात. चला तर मग जाणून घेऊ उपाय….

  • जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करुन प्यायल्यानेही फायदा होतो.
  • दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
  • बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते. बडिशेपचे दाणे चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
  • केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात अॅसिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे. याने पित्ताचा त्रास कमी होतो.
  • तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. ज्यामुळे पोटातील अॅसिडपासून तयार होणारे विषारी घटकांपासून बचाव होतो. पित्ताचा त्रास जाणवत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.

महत्वाच्या बातम्या –