Share

टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? थांबा आधी ‘हे’ वाचा

Published On: 

🕒 1 min read

अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते एकत्र खाणे धोकादायक आहे. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन या समस्या होऊ शकतात.

काय आहे असे होण्याचे कारण?

काकडी आणि टोमॅटो दोन्हीही विरूद्धा आहार सूचीत येतात. या सूचीत असण्याचा अर्थ दोन्ही फळं ऎकमेकांच्या विपरित असतात. हे दोन्ही फळं पोटात पचण्याच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्यामुळे पोटात या दोन्हीमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

का होतात या समस्या?

टोमॅटो आणि काकडी दोघांचंही नेचर वेगळं आहे. एक लवकरच डायजेस्ट होतं तर दुसरं हळूहळू. त्यामुळे दोन्ही विपरित डायजेशन असलेल्या फळभाज्या एकत्र खाणं समस्या निर्माण करू शकतात. कारण एक पचल्यावर इंटेस्टाइनमध्ये जातं आणि दुस-याची डायजेशन प्रक्रिया सुरूच असते. यामुळे शरिरात ताठरता जाणवते. अशाप्रकारचा त्रास होणे संपूर्ण शरिरासाठी हानिकारक होऊ शकतं.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या