Share

‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!

Published On: 

🕒 1 min read

दात पिवळे होण्याची समस्या अनेकांना असते. मात्र, सर्वात आधी आपण लक्षात घेतले पाहिजे की, दात पिवळे होण्यामागे कोणत्याही आजाराचं कारण नसतं. अस्वच्छपणा आणि चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे, हे यामागील कारणे आहेत. धुम्रपानामुळेही दात खराब होतात. तसेच चहा-कॉफिचं अतिसेवही याला कारणीभूत ठरु शकतं.

बेकिंग सोडा आणि लिंबू रसाची पेस्ट आपण रोजच्या जेवणावेळी अनेकदा वापरत असतो. आपल्या बहुतेक जणांच्या घरी या दोन्ही वस्तू उपलब्धही असतात. दात पांढरे शुभ्र करण्यासाठी सोडा आणि लिंबू अत्यंत परिणाम कारक आहेत.बेकिंग सोडा खरखरीत असल्याने तो दातांवर स्क्रबर म्हणजेच घासण्याचं काम करतो, तर लिंबात सायट्रक अ‍ॅसिड असतं, ज्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या पेस्टचं मिश्रण करुन ते दातांना लावा. त्यासाठी चमचाभर बेकिंग सोडा घेऊन, त्यात लिंबाचा रस एकत्र करा आणि त्याचा घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर ट्युथब्रशने ही पेस्ट दातांना लावा. मिनिटभर पेस्ट दातांनाच राहू द्या, त्यानंतर चूळ भरा आणि तोंड स्वच्छ करा.

अर्थात, हा झाला घरगुती उपाय. मात्र, दातांमध्ये काही समस्या असेल, तर तुमच्या डेंटिस्टला जाऊन भेटून त्यांचा सल्ला घेणं अधिक योग्य.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या