शेतकऱ्यांनी फवारणीसाठी नोंदणीकृत औषधे, कृषी निविष्ठांचा वापर करावा

लातूर – सध्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात नोंदणीकृत व अनोंदणीकृत कृषी निविष्ठा उपलब्ध् आहेत. नोंदणीकृत कृषी निविष्ठाबद्दल सर्व माहिती ही शासन स्तरावर उपलब्ध्अ सते तसेच नोंदणीकृत कृषी निविष्ठाच्या वापराबद्दल, गुणवत्तेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कायद्याअंतर्गत योग्य कार्यवाही करता येते.

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

परंतु अनोंदणीकृत कृषी निविष्ठा संबधी व गुणवत्तेबाबत या कार्यालयाकडे कुठलीही माहिती उपलब्ध्  नसते. परिणामी अनोंदणीकृत कृषी निविष्ठांच्या विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी फवारणीसाठी नोंदणीकृत औषधे, कृषी निविष्ठांचा वापर करावा. अनोंदणीकृत कृषी निविष्ठांच्या माहिती साठी आपल्या संबंधित गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी धनंजय मुंडे यांनी केले मोठे आवाहन

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या