शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना विविध संकटातून जावे लागत आहे. तसेच २०१७ मध्ये पीक कर्जमाफीची घोषणा झाली. परंतू वाशिम जिल्हयातील काही शेतकऱ्यांना अजूनही त्याचा लाभ मिळाला नाही. तसेच जांब अढाव येथील शेतकऱ्यांच्या देखील खूप मागण्या प्रलंबित आहेत. या सर्व मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी शेतकरीा बचाव संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पीककर्ज माफीपासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित असून, याकडे शासन, प्रशासनाने लक्ष द्यावे त्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटनेचे पदाधिकारी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.

अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही, कर्ज पुनरगठन व चालू  पीक कर्ज यासंदर्भात जिल्हाधिकारी रूषिकेश मोडक व जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांना निवेदन दिले. जिल्हा उपनिबंधक कटके यांच्याशी सविस्तर चर्चा करून  तात्काळ चौकशी करून  योग्य ती कार्यवाही करावी व संबंधीत शेतकरी बांधवांचा संभ्रम दूर करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या –

आत्महत्येची परवानगी द्या’; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टाची 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी