Vitamin D | सप्लीमेंट्स नाही, तर ‘या’ पदार्थांचे सेवन करून विटामिन डीची कमतरता करा दूर

Vitamin D | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी शरीरात आवश्यक ती जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात विटामिन डी मुबलक प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे. कॅल्शियम शोषण्यासाठी विटामिन डी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर हाडांच्या वाढीस आणि हाडांच्या पुनर्वसनाला चालना देण्यासाठी विटामिन डी महत्वाची भूमिका बजावते. त्याचबरोबर विटामिन डी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील जळजळ रोखण्यास मदत करते. सूर्य हा विटामिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे. तुम्ही दररोज काही मिनिटे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात गेल्याने तुमची विटामिन डीची पातळी लक्षणीय रित्या वाढू शकते. मात्र, बहुतांश लोकांना विटामिन डीच्या कमतरतेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात.

अंडी (Egg-For Vitamin D)

शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकतात. अंड्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन प्रमाणे विटामिन डी भरपूर प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर अंड्याचे सेवन केल्याने शरीरातला इतर अनेक पोषक तत्वे मिळू शकतात.

मासे (Fish-For Vitamin D)

माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आढळून येते. त्याचबरोबर माशांमध्ये विटामिन डी देखील माफक प्रमाणात आढळून येते. शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही सॅल्मन मासे खाऊ शकतात. 100 ग्रॅम सॅल्मन माशांमध्ये सुमारे 245 आययू विटामिन डी आढळून येते. त्यामुळे शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी सॅल्मन माशांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

संत्रा (Orange-For Vitamin D)

संत्र्याला विटामिन सीचा चांगला स्त्रोत मानला जातो. परंतु संत्र्यामध्ये विटामिन डी देखील चांगल्या प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर संत्र्यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे इतर पोषक घटक देखील आढळून येतात. त्यामुळे संत्र्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. संत्र्याच्या रसाच्या सेवन केल्याने शरीरातील विटामिन डीची कमतरता दूर होऊ शकते.

दूध (Milk-For Vitamin D)

दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते, त्याचबरोबर दुधामध्ये विटामिन डी देखील माफक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे दुधाला सुपरफुडचा दर्जा दिला आहे. शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास दुधाचे सेवन करू शकतात.

शरीरातील विटामिन डीची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही वरील पदार्थांचा आहारात समावेश करू शकतात. त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

व्यवस्थित झोप घ्या (Get proper sleep-For Mental Health)

मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी व्यवस्थित झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज आठ तास झोप घेणे अनिवार्य आहे. व्यवस्थित झोप झाल्यावर तुम्ही दिवसभर ताजे आणि सकारात्मक राहू शकतात.

मेडिटेशन करा (Do meditation-For Mental Health)

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज ध्यान आणि योगासने करणे खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज मेडिटेशन केल्याने मन शांत आणि सकारात्मक राहते. त्याचबरोबर नियमित ध्यान केल्याने शारीरिक आरोग्य देखील चांगले राहू शकते.

पोषक आहाराचे सेवन करा (Consume nutritious food-For Mental Health)

नैराश्य, तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोषक आहाराचे सेवन केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतात. निरोगी आहाराचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादींचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Benefits of Pulses | दररोज कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Cockroach | घरामध्ये झुरळाचे प्रमाण वाढले आहे? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Fenugreek Seeds | सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Amla Juice | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Papaya Smoothie | पपई स्मुदी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे