🕒 1 min read
सत्तासंघर्ष आणि राजकारण यासाऱ्या गदारोळातून कायम वंचित असलेल्या शेतकरी वर्गासाठी दिलासा देणारे वृत्त आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता शासनाने वितरित करण्यात आला आहे. मराठवाड्यासाठी 3,200 कोटींपैकी 819 कोटी 63 लाख रुपये देण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाने हे वाटप सुरू केले असून, अवघ्या 11 दिवसांत यातील 817 कोटी 89 लाख 27 हजार रुपये म्हणजे 99.79 टक्के मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. उर्वरित येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नुकसान झालेल्यापैकी आतापर्यंत 10 लाख 74 हजार 915 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या निकषानुसार 13 नोव्हेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकसानीची संपूर्ण माहिती राज्य शासनाकडे पाठवलेली आहे. परतीच्या पावसादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले होते. राज्यात सर्वांत जास्त नुकसान हे मराठवाड्यात झाले. विभागातील तब्बल 41 लाख 49 हजार 175 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दिवाळीनंतर याचे तातडीने पंचनामे करण्यात आले.
राज्यपालांनी घेतलेल्या बैठकीनंतर 18 नोव्हेंबरच्या शासन आदेशानुसार राज्यातील 34 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यासाठी दोन हजार 59 कोटी 36 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार मराठवाड्याला 819 कोटी रुपये प्राप्त झाले. त्यानुसार विभागीय प्रशासनाकडून त्या-त्या जिल्हा प्रशासनाला सदर निधीचे वाटप करण्यात आले होते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.
मराठवाड्यात एकूण शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर विभागातील 44 लाख 33 हजार बाधित शेतकऱ्यांसाठी तीन हजार 237 कोटी 76 लाख 84 हजार 960 रुपयांची आवश्यकता आहे. पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे असून, यानंतर दुसरा नि तिसऱ्या टप्प्याचे पैसेही लवकरच मिळतील, अशी आशा आहे.
दरम्यान आता पर्यंत औरंगाबाद येथे1 लाख 50 हजार 23– 121 कोटी 81 लाख एवढे 100% अनुदानाचे वाटप झाले आहे. तर जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद , नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सरासरी 99% अनुदान वाटप झाले आहे. तर एकूण 10 लाख 74 हजार 915– 817 कोटी 89 लाख रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50 हजार
सांगलीच्या महापुरात बचावकार्याची बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू
नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड – सुधीर मुनगंटीवार
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे – भगत सिंह कोश्यारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





