‘हा’ पदार्थ रिकाम्या पोटी घेतल्यास तब्बल 6 रोगांपासून होईल बचाव!

घरात ड्रायफ्रुटमध्ये असणारा पदार्थ (Substance) म्हणजे ‘बदाम’. तुम्ही काही विसरलात की, तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. बदाम खाण्याचे भरपूर फायदे (badam benefits in marathi) आहेत. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले न्युट्रीएंटस म्हणजेच पोषक तत्वे तुम्हाला बदामामध्ये मिळू शकतात. बदामापासून तेल काढले जाते म्हणजे त्यामध्ये फॅट आलेच. पण बदामामधील फॅट हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असते.असे बदाम खाण्याचे बरेच फायदे आहेत. तसेच बदाम व्हिटॅमिन ई चा देखील चांगला स्त्रोत आहेत, जे तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते. कॅल्शियम, लोह, झिंक आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक देखील बदामामध्ये आढळतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात.

त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये मधाला (Honey Benefits In Marathi) संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. मध हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करतात. तर काही जण पाककृतींमध्येही मधाचा समावेश करतात. चवीसोबतच मधामध्ये शरीरास उपयुक्त असणाऱ्या कित्येक पौष्टिक घटक आहेत. तसेच संशोधनात असे दिसून आले आहे की मध बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट करू शकतं. त्यात नैसर्गिकरित्या हाइड्रोजन पेरोक्साइड, अँटीसेप्टिक असते. हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल म्हणून देखील कार्य करते.

जर तुम्हाला मध आणि बदामाचे अधिक फायदे करून घ्यायचे असतील तर तुम्ही या दोन्ही गोष्टी सकाळी रिकाम्या पोटी खाव्यात. चला तर जाणून घेऊया या मिश्रणाचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत.

  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लाभदायक

मध आणि बदाम या दोन्हीमध्ये हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करणारे अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळे आपण मध आणि भाजलेले बदाम यांचे एकत्र        सेवन केले तर आपली कोलेस्ट्रॉल पातळी सुधारण्यास मदत होते.

  • इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग बनते

बदाममध्ये झिंक, बी जीवनसत्त्वे आणि लोह यांसारख्या पोषक तत्वे आहेत. तसेच मधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक गुणधर्म आहेत. तसेच हे मिश्रण फ्लूच्या हंगामात शरीर मजबूत करण्यास देखील मदत करू शकते.

  • आयर्नची कमतरता होते दूर

बदामाच्या एक औंसमध्ये सुमारे 1.05 मिलीग्रॅम लोह असते, तर एक चमचा मधामध्ये 0.09 मिलीग्रॅम लोह (iron) असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टीचे सेवन केल्याने आपल्यातील आयर्नची कमतरता दूर होऊ शकते.

  • स्किन बनते ग्लोइंग

वाळलेल्या बदामांना मधात बारीक करून बनवलेला फेसपॅक त्वचेची रोमछिद्रे साफ करून त्वचा मऊ आणि चमकदार बनवू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम, पुरळ आणि सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे याचा फायदा आपल्या स्किनला देखील होतो.

  • वजन होते कमी

मध आणि बदाम एकत्र खाल्याने आपले वजन कमी होते. मधामध्ये एंजाइम असतात जे तुमची भूक कमी करण्यास मदत करतात तर बदाममध्ये प्रथिने आणि फायबर असतात ज्यामुळे तुमचे पोट दिवसभर भरलेले राहते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता.

महत्वाच्या बातम्या –