हाडं मजबूत ठेवायची असतील तर, ‘या’ गोष्टी खाणे टाळा! जाणून घ्या

आजकाल खूप कमी वयात युवकांना हाडांच्या दुखण्याची समस्या दिसते. याच कारण आपण रोजच्या जीवनातील खाद्यपदार्थ. असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होतो आणि आपली हाडं ठिसूळ होऊन त्यांची दुखणी वाढतात. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे होतं हाडांचं नुकसान…

कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बनडाय ऑक्साइड आणि फॉस्फरसचं प्रमाणं जास्त असतं. ज्यामुळे आपल्या हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे कोल्ड ड्रिक्स पिणं शक्यतो टाळावं. चहा आणि कॉफीचं जास्त प्रमाणातील सेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकरक असतं. यातील कॅफीन हाडांना ठिसूळ बनवतं. अल्कोहोलच्या सेवनानं शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे हाडांची झीज होते आणि परिणामी हाडांची दुखणी वाढतात.

मीठाचं अतिसेवन शरीरासाठी घातक असतं. याचा थेट परिणाम हाडांच्या मजबूतीवर होतो. मीठामध्ये सोडियमचं प्रमाणं जास्त असतं. त्यामुळे हे शरीरात गेल्यावर हाडांमधील कॅल्शियम यूरीनमधून शरीराबाहेर टाकलं जातं.

महत्वाच्या बातम्या –